¡Sorpréndeme!

Eknath Shinde Reaction After Meeting Raj Thackeray | राज ठाकरेंच्या भेटीनंतर शिंदेंची प्रतिक्रिया

2025-04-15 0 Dailymotion

Eknath Shinde Reaction After Meeting Raj Thackeray | राज ठाकरेंच्या भेटीनंतर शिंदेंची प्रतिक्रिया 
मुंबई : सध्या निवडणुका नसल्याने त्यावर कोणतीही चर्चा करण्याची शक्यता नाही. राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला असं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आजची भेट ही केवळ आणि केवळ सदिच्छा भेट होती असंही एकनाथ शिंदे म्हणाले. बाळासाहेबांच्या आठवणीने आम्ही पुन्हा जुन्या आठवणीत रमलो असल्याचंही एकनाथ शिंदे म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.   एकनाथ शिंदे म्हणाले की, "गेल्या काही दिवसांपासून, विधानसभा निवडणूक झाल्यापासून भेटण्याची, गप्पा मारण्याची दोघांचीही इच्छा होती. आज बाळासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. आम्ही एकत्र काम केलं आहे. त्यामुळे जुन्या गोष्टींवर चर्चा झाली. ही सदिच्छा भेट होती. त्यामुळे राजकीय अर्थ काढण्याची कोणतीही आवश्यकता नाही."  विकासकामांवर चर्चा, पण राजकीय चर्चा नाही एकनाथ शिंदे म्हणाले की, "मुंबईमधील सिमेंटच्या रस्त्यांची मी पाहणी केली. त्यावर राज ठाकरेंशी चर्चा झाली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा न होता मुंबईतील विकासकामांवर चर्चा झाली.